रोटरी खारघर मिडटाऊन चा स्तुत्य उपक्रम..
पनवेल वैभव / दि.१३(वार्ताहर): रोटरी खारघर मिडटाऊनने खारघरमधील एका खेडेगावात 20 टीबी रुग्ण आणि 20 गर्भवती महिलांना पोषण आहार आणि प्रथिने पूरक आहार दान केले.
हा कार्यक्रम जिल्हा क्षयरोग अधिकारी श्री सचिन जाधव, क्लबचे अध्यक्ष आरटीएन शैलेश पटेल, प्रथम महिला दिपा पटेल, सेवा प्रकल्प संचालक आरटीएन डॉ रविकिरण, आयपीपी आरटीएन अनुप गुप्ता आणि क्लबचे इतर वरिष्ठ सदस्य यांच्या कृपाळू उपस्थितीत पार पडला. या प्रकल्पाचा मुख्य हेतू म्हणजे गरजू क्षयरुग्णांना प्रथिनेयुक्त सप्लिमेंट्स आणि अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांची पुनर्प्राप्ती जलद होईल. जिल्हा क्षयरोग अधिकारी श्री सचिन जाधव यांनी रोटरी खारघर ला असाच कार्यक्रम दर महिना ला ठेवा असा इच्छा जाहिर केली. रोटरी खारघर अध्यक्ष शैलेश पटेल यांनी हमीं दिली की असा कार्यक्रम आम्ही सतत चालू ठेवायचा पूर्ण प्रयत्न करू.