रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना - युवासेनेचा झंझावात ...
पनवेल वैभव वृत्तसेवा : -
मुख्यमंतत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे तथा श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू युवासेनेचे सचिव, शिवसेनेचे उरण विधानसभेचे निरीक्षक, कोकण समन्वयक रुपेश पाटील हे गेले महिनाभर उत्तर महाराष्ट्र दौरा करुन आले आणि त्यांनी उरण मध्ये लाडकी बहिण योजना कँप सुरु केले लगेचच त्यांनी लाडकी बहीण कुटुंब भेट विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना घेवून उलवे शहर करंजा, न्हावा शेवा, जसखार, उरण शहर, खोपटे, सारडे येथे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेलेल्या बहिणींना व त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली त्याच्या इतर समस्या जाणून घेतल्या त्याच माध्यमातून त्यांनी अनेक महिलांचे प्रवेश घेतले, उलवे शहर मधून महिला शहर प्रमुख सोनल घरत आणि विधानसभा संघटक मनोज घरत यांच्या माध्यमातून अनेक प्रवेश घेतले काल उलवे शहरातील शॅकडो महिलांचा तथा पुरुषांचा युवकांचा प्रवेश कार्यक्रम रामशेठ ठाकूर स्पोर्ट काँप्लेक्स येथे पार पडला ह्यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा मेघाताई दमडे, उरण तालुका प्रमुख महेंद्र पाटील, उरण - पनवेल ग्रामीण तालुका प्रमुख बाळा नाईक, शहर प्रमुख वयनगणकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रीतम सुर्वे, प्रथम पाटील डिजिटल मीडिया प्रमुख सागर रोकडे व पदाधिकारी उपस्थित होते, त्याच बरोबर कर्जत येथे सेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे यांच्या तथा युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सूचनेने सचिव रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा युवकांचा- युवासेनेचा भव्य मेळावा पार पडला ! ह्यात शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर, पनवेल उपजिल्हा प्रमुख रोशन पवार, उरण विधानसभा उपजिल्हा प्रीतम सुर्वे, जिल्हा प्रमुख अक्षय पिंगळे, तालुका प्रमुख अमर मिसाळ, प्रसाद थोरवे, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पनवेल, खारघर व कर्जत मधील युवकांचा पक्ष प्रवेश व जिल्हा पदाधिकारी मेळावा पार पडला, ह्यात रुपेश पाटील यांनी आपल्या भाषणात संबोधित करताना म्हटलं की इथले शिवसेनेचे उमदेवार महेंद्र थोरावे हे मोठ्या मताध्यक्याने विजयी होतीलच पण उरण चे महायुतीचे उमेदवार महेश बालदी तथा पनवेल विधानसभेचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना ही बहुमताने विजयी करण्यासाठी रायगड युवासेना कटिबद्द असून दिवसरात्र कार्य करण्याचे आदेश ह्यावेळी युवासेना पदाधिकारी व युवासैनिकांना व युवती सेनेला देण्यात आल्या ,
रूपेश पाटील हे स्वतः ह्या तिन्ही विधानसभा प्रचारात सामील होणार असून हे उत्तर रायगड मधील उमेदवार बहू मताने जिंकण्याचा मानस करुन हा शिवसेनेचा व युवासेनेचा प्रचार झंझावात सुरु राहणार आहे असे त्यांनी घोषित केले आहे.