पितृपक्ष निमित्ताने शांतीवन कुष्ठरोग निवारण केंद्र येथे औषधांचे दान..
आठवण १९८२, अभिनव ज्ञान मंदिर शाळा कर्जत.. 

पनवेल वैभव वृत्तसेवा : -
आठवण १९८२ तर्फे १ ऑक्टोबर रोजी नेरे, पनवेल येथील शांतीवन कुष्ठरोग निवारण केंद्र इथे जाऊन  पितृपक्ष निमित्त अन्न दान करण्या ऐवजी तेथील रुग्णांना जी आवश्यक औषधे लागतात ती औषधे व अन्य साहित्य भेट देण्यात आले.  

सदर उपक्रमास अभिनव ज्ञान मंदिर शाळा कर्जत च्या ८१-८२  च्या मैत्रांगण (मित्र - मैत्रिणी) यांनी सामूहिक रित्या दिलेली औषधे शांतीवन येथील नंदू उरणकर आणि श्री. शिंदे यांनी त्याचा स्वीकार करत आठवण ८२ समुहास मनोमन धन्यवाद दिले. या उपक्रमा वेळी वर्षा देसाई पाठारे, कल्पना हिंदुराव ढमाले , सविता चंदने झेमसे, पुरुषोत्तम वाणी, सुनील भोपतराव, दिनेश अडावदकर हे सदस्य उपस्थित होते.

कोट -
ज्या आपल्या रुढी परंपरा आहेत त्या ज्याने त्याने आपल्या मर्जीनुसार करावे, पण ते करताना माणुसकी जपली पाहिजे.मला माझ्या मित्र मैत्रिणींचा खूप अभिमान आहे, जेंव्हा केंव्हा मी काही करायची साद देते, त्यावेळी सगळे माझ्यावर विश्वास ठेवून पैसे देतात. तुमचा माझ्यावर असलेला विश्वास ही माझ्यासाठी खास मैत्री आहे. या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही... 
आठवण ८२ अशीच साथ राहू दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना. 
नगरसेवक ऍड. वर्षा देसाई पाठारे.(कर्जत)
Comments