कारची काच फोडून ६ लाखांची रोकड लंपास...
कारची काच फोडून ६ लाखांची रोकड लंपास...
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः अज्ञात चोरट्यांनी पनवेल मधील गार्डन हॉटेल जवळ उभ्या असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या महिंद्रा एक्सयुव्ही कारची काच फोडून त्यातील 6 लाखाची रोख रक्कम असलेली लेदरची बॅग चोरुन नेल्याची घटना घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार प्रशांत पिंगळे (56) बांधकाम व्यावसायिक खारघरमध्ये राहण्यास आहेत. पनवेल येथे कामानिमित्त गेले होते. यावेळी त्यांनी आपली महिंद्रा एक्सयुव्ही कार गार्डन हॉटल जवळ असलेल्या ओमसाई बिल्डींग समार उभी केली होती. त्यानंतर ते कामानिमित्त निघून गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून त्यात पाठीमागील सीटवर ठेवलेली 6 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली लेदर बॅग चोरुन नेली. काही वेळानंतर प्रशांत पिंगळे आपल्या कारजवळ आल्यानंतर त्यांना कारची काच फुटल्याचे तसेच कार मधील रोख रक्कमेची बॅग चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Comments