खारघर वसाहतीमधील मोठ्या प्रमाणात नागरिक करणार स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश...
पनवेल वैभव, दि.7 (संजय कदम) ः खारघर वसाहतीमधील नागरिक मोठ्या प्रमाणात लवकरच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करणार असून या संदर्भातील बैठक नुकतीच जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी संबंधित व्यक्तींबरोबर घेतली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी खारघर येथे सेक्टर दहा मध्ये श्यामलाल सुनील कुमार दीपक व अजित व बलविंदर सिंग जग्गातार सुरेंद्र राणा राजकुमार चावला सौरभ पवार मयूर गायकवाड यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांना योग्य तो मानसन्मान पक्षातर्फे देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. लवकरच मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिली आहे.
फोटो ः महेश साळुंखे यांच्या सोबत बैठक