६ मोबाईल चोरणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात..
६ मोबाईल चोरणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
पनवेल वैभव, दि.9 (संजय कदम) ः करंजाडे वसाहत परिसरातून महागडे सहा मोबाईल चोरणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
करंजाडे वसाहत परिसरात गेल्या काही दिवसापासून मोबाईल चोरीचे प्रकार वाढले होते. या संदर्भात वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सपोनि प्रकाश पवार, पो.हवा.महेश पाटील, अमोल पाटील, अमोल डोईफोडे, संदेश म्हात्रे, पो.शि.विशाल दुधे, नितीन कराडे आदींचे पथक तांत्रिक तपासाद्वारे व गुप्त बातमीदाराद्वारे माहिती घेत असताना त्यांना करंजाडे परिसरातील दोन अल्पवयीन मुलांसंदर्भात माहिती मिळाली. त्यानुसार या दोन मुलांना ताब्यात घेवून अधिक तपासामध्ये त्यांनी चोरलेले सहा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.


फोटो ः मोबाईल फोन
Comments