लायन्स सरगम तर्फे मधुमेह आणि नेत्र चिकित्सा शिबिर..
लायन्स सरगम तर्फे मधुमेह आणि नेत्र चिकित्सा शिबिर

पनवेल / प्रतिनिधी : -
लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे सेवा सप्ताहानिमित्त वडाळे तलाव पनवेल येथे सकाळी चालायला येणाऱ्या नागरिकांसाठी मधुमेह तपासणी करण्यात आली. पनवेल महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी शैलेश गायकवाड, सईद मुल्ला यांचेसहित 79 नागरिकांनी या तपासणीचा लाभ घेतला.
त्यानंतर किड्स क्लब येथे 3 ते 15 वयोगटातील मुलांची नेत्र तपासणी करण्यात आली.
ला. मूर्ती यांनी सांगितले की एवढ्या लहान मुलांची नेत्र तपासणी करणे खूप गरजेचे आहे परंतु कोणताच क्लब अशी तपासणी करत नाही आणि सरगम क्लबने हा उपक्रम आयोजित केला हे कौतकस्पद आहे. याप्रसंगी डिस्ट्रिक्ट साईट फर्स्ट चेअरमन ए एस एन मूर्ति, शाळेच्या मुख्याध्यापिका चेतना देढीया, सरगम क्लबच्या अध्यक्ष मानदा पंडित, प्रेमेंद्र बहिरा, धवल शहा, झोन चेअरमन अलकेश शहा, संजय गोडसे, स्वाती गोडसे, ओमकार खेडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
Comments