शनिवारी पनवेलमध्ये विजय निर्धार युवा मेळावा
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल विधानसभेच्यावतीने शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०६ वाजता शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या मैदानात विजय निर्धार युवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यास कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख व उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी महापौर कविता चौतमोल, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारत देश युवकांचा म्हणून जगात ओळखला जातो. त्याच अनुषंगाने युवकांच्या हक्कांसाठी तसेच त्यांचे सर्व स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा सातत्याने काम करत असते. या युवा मोर्चाच्यावतीने निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास युवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस अभिषेक भोपी, दिनेश खानावकर, पनवेल तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, कामोठे मंडल अध्यक्ष तेजस जाधव, कळंबोली मंडल अध्यक्ष गौरव नाईक, खारघर मंडल अध्यक्ष नितेश पाटील यांनी केले आहे.