नवी मुंबईच्या IIDT इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांच्या फॅशन ब्रँडचे शानदार लाँच ...
विद्यार्थ्यांनी बनवलेले पोशाखात अवतरल्या फॅशन जगतातल्या तारका
फॅशन जगतातल्या मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे तोंडभरून कौतुक
फॅशन जगतात उत्तम व्यावसायिक तयार करण्याचा दृष्टीकोन- अफशा कपाडिया
पनवेल वैभव / नवी मुंबई :-
IIDT हे नवी मुंबईमध्ये असलेले सर्वोत्तम फॅशन डिझाइन आणि इंटिरियर डिझाइन कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे.IIDT कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉर्डेन तसेच पारंपरिक ड्रेसेस आणि इंटेरियर डिजाइन्स यांचा फॅशन शो आणि फ्रेशर्स पार्टी दिनांक २८ सप्टेंबर रोजी खारघरमधील रॉयल ट्युलिप हॉटेलमध्ये संपन्न झाली. फॅशन जगतात उद्योजक व व्यावसायिक तयार करण्याच्या दृष्टीकोनातून, IIDT कॉलेजमध्ये फॅशन डिझाइन कोर्स आणि इंटिरियर डिझाइन कोर्स करून विद्यार्थी आज आपल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत.
याच IIDT संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना संधी देत विविध ड्रेसेस आणि इंटेरियर डिसाईन्सचे काही उत्कृष्ट नमुने तयार केले. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या फॅशन ब्रँडचे शानदार लाँच यावेळी संपन्न झाले. मॉडेल्सने या सर्व नवोदित ब्रँडचे ड्रेसेस उत्तमरीत्या रॅम्पवर सादर केले. फॅशन जगतात उत्तम व्यावसायिक तयार करण्याचा दृष्टीकोन असून IIDT हे इन्स्टिटयूट विद्यार्थ्यांना फक्त फॅशन जगतातले ज्ञानच देत नाही तर त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी देखील सर्वकाही करते अशा शब्दात IIDT इस्न्टिट्यूटच्या डायरेक्टर अफशा कपाडिया सचदेव यांनी आपल्या संस्थेचे कौतुक केले. या नाविन्यपूर्ण कलाकृतींचे या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या विविध मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी कपिल शर्मा शोचे प्रोड्युसर SK सर हे उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले.
या शानदार कार्यक्रमाला कपिल शर्मा शोचे प्रोड्युसर संजीव कुमार उर्फ SK, मॉडेल आणि ऐक्ट्रेस प्रिया सिंग, नम्रता चौहान, फॉरेव्हर प्रिटी ब्रॅण्डच्या डायरेक्टर नेस्टा शर्मा, इंटेरियर डिजायनर रेश्मा शेजपाल आणि भाविक शेजपाल आणि मान्यवर तसेच इंस्टिट्यूटचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.