पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबविण्यासाठी महाविद्यालयामध्ये जनजागृतीपर शॉर्ट फिल्मचे प्रसारण..
        जनजागृतीपर शॉर्ट फिल्मचे प्रसारण

पनवेल,दि.06: महापालिका कार्यक्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला जास्तीत जास्त चालना देण्यासाठी मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत महापालिकेच्यावतीने आयुक्त तथा प्रशासक श्री. मंगेश  चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ ही मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत गेल्या काही दिवसांपासून केएलई महाविद्यालय कळंबोली, पिल्लई आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय नवीन पनवेल, एमएनआर इंटरनॅशल स्कूल कामोठे याठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबविण्यासाठी जनजागृतीपर शॉर्ट फिल्मचे प्रसारण करण्यात आले.

 प्लास्टिक विरहीत उत्सव ,प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती ऐवजी शाडू किंवा लाल मातीच्या मुर्तीची पुजा तसेच पर्यावरणपूरक उत्सवाचे महत्व नागरिकांना कळावे यासाठी महापालिकेने मागील वर्षी खास शॉर्टफिल्म तयार केली होती. या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून महापालिका शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक उत्सवाचे महत्व समजून सांगितले जात आहे.

 
 महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावरती भर दिला जात आहे. याच्या अमंलबजावणीसाठी उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेनुसार नुकतेच केएलई महाविद्यालय, पिल्लई आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय नवीन पनवेल, एमएनआर इंटरनॅशल स्कूल कामोठे याठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबविण्यासाठी जनजागृतीपर शॉर्ट फिल्मचे प्रसारणाचे आयोजन करण्यात आले.
Comments