लाखो रुपये किंमतीचा गुटखा साठा करण्यात आला हस्तगत ; २ आरोपी गजाआड..
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः लाखो रुपये किंमतीचा गुटखा साठा नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हस्तगत केला असून याप्रकरणी दोघा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
सर्वेशकुमार मोहनलाल मौर्या (22) व शामु शिवगोविंद मौर्या (24) हे दोघे उलवे सेक्टर 23 मध्ये राहणारे असून ते परराज्यातून छुप्या पद्धतीने गुटखा आणून त्याची विक्री पनवेल परिसरात व नवी मुंबई परिसरात करीत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळताच अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वपोनि संदीप निगडे, सपोनि श्रीकांत नायडु, सचिन कोकरे व त्यांच्या पथकाने या दोघांना सापळा रचून त्यांच्या गाडीसह ताब्यात घेतले असता त्यांच्या गाडीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा असा मिळून जवळपास 1 लाख 1 हजार 880 रुपये किंमतीचा माल आढळून आल्याने तो साठा जप्त केला आहे व या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फोटो : संग्रहित