पनवेलमध्ये आकाश बांठिया यांच्या 'बांठिया डेअरी फार्म'चे शानदार उदघाटन..
दागिने घडवणारे 'बांठिया'आता नागरिकांना देणार आरोग्याचे वरदान 


स्वतःचाच तबेला असल्याने मिळणार सात्विक दुग्धजन्य पदार्थ ; शुद्धतेची संपूर्ण हमी

पनवेल वैभव / प्रतिनिधी दि.१६
सोने खरेदी करायचे झाल्यास पनवेलकरांची पहिली पसंती बांठिया ज्वेलर्स यांनाच मिळते. पनवेलकरांचा हाच विश्वास सार्थ ठरवत आता बांठिया या प्रसिद्ध ग्रुपने आपल्या पहिल्या डेअरीचे म्हणजेच 'बांठिया डेअरी फार्म'चे पनवेलमध्ये शानदार उदघाटन केलं आहे. आकाश बांठिया यांच्यामार्फत हा नवीन आउटलेट सुरु करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे आकाश बांठिया हे गेली ५ वर्ष आपला तबेला सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या तबेल्यातील दुभत्या जनावरांचेच सकस आणि निर्भेळ दूध हे ग्राहकांना मिळणार आहे. 
बांठिया डेअरी फार्ममध्ये दूध, पनीर, दही, मसाला दूध, चहा, लस्सी यांसारखे दुग्धजन्य पदार्थ अत्यंत सात्विक पद्धतीने आणि कोणत्याही प्रकारच्या भेसळीशिवाय बनत असल्याचे आकाश बांठिया यांनी सांगितले. एकदा येऊन पहा, आमच्या प्रॉडक्ट्सचा आस्वाद घ्या, ट्रॅडीशन ऑफ प्युरिटी या आमच्या स्लोगनची प्रत्यक्षात अनुभूती घ्या, असे आवाहन बांठिया डेअरी फार्मचे सर्वेसर्वा आकाश बांठिया यांनी केले आहे.

बाईट - आकाश बांठिया
Comments