पनवेलचा ओरियन मॉल देखील रिकामा करून तपासणी सुरू...
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः वाशी येथील इन ऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल आला आणि काही क्षणातच मॉल रिकामा करण्यात आला. या मॉलसह एकूण 26 मॉलची नावे या मेलमध्ये असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पनवेलच्या ओरायन मॉलला देखील रिकामा करण्यात आले. सध्या सर्व ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.
वाशी येथील इन ऑर्बिट मॉलसह 25 मॉलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा मेल इन ऑर्बिट मॉलला आला होता.नवी मुंबईतील वाशी मधील इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. नवी मुंबई मधील वाशी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉल मध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल मॉल प्रशासनाला करण्यात आला आहे. हा मॉल सर्वात गजबजलेला मॉल समजला जातो. आणि याच नवी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. प्रशासनाला मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल मिळताचा संपूर्ण मॉल खाली करण्यात आला आहे. बॉम्ब शोधक, नाशक पथक देखील घटनास्थळी दाखल झालं आहे. आता संपूर्ण मॉलची तपासणी करण्यात येत आहे.या मेलमध्ये पनवेलच्या ओरायन मॉलचेही नाव असल्याचे समजते आहे.म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या मॉलला जाऊन नागरिकांना मॉलमधून बाहेर जाण्याचे आवाहन केले.अचानक पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान पनवेलच्या ओरायन मॉलमध्येही पोलिस तपासणी करत आहेत.
फोटो ः ओरियन मॉल