राजस्थान येथील अपहरणासह खुनाच्या गुन्हयातील दोन वर्षापासुन फरार आरोपीस पनवेल शहर पोलीसांनी केले गजाआड..
 आरोपी पनवेल शहर पोलीसांनकडून गजाआड
पनवेल वैभव, दि.13 (संजय कदम) ः राजस्थान येथील अपहरणासह खुनाच्या गुन्ह्यातील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे.
राजस्थान रान्यातील जिल्हा करोली मध्ये असलेल्या टोडाभिम पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 14/07/2022 रोजी दाखल गु.रजी.नंबर 288/2022 भादवि कलम 143, 323, 341, 365, 336, 506, 302 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील फिर्यादी हरकेश भरतलाल मिना वय - 36 वर्ष, यांनी दिलेल्या तकारीप्रमाणे एकुण आठ आरोपीत यांनी फिर्यादी व गुन्हयातील मयत रतनलाल मिना रा. मधोपुरा यांचे अपहरण करून त्यांचा मारहाण केली तसेच त्यांचे दुचाकी वाहनास जाणुनबुजुन धडक देवुन ’मयत रतनलाल मिना यांच्या मृत्युस कारणीभुत झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील पाहीजे आरोपीत लोकेशकुमार गिरीराजप्रसाद मिना हा गुन्हा घडल्यापासुन त्याचे अस्तीत्व लपवुन होता. आरोपीतच्या शोधासाठी राजस्थान येथील जिल्हा विशेष पथकाचे अंमलदार एएसआय/बहाद्दुर सिंग, कॉन्स्टेबल धारासिंग मिना, कॉन्स्टेबल धनसिंग मिना यांनी सदर आरोपीत याचे तांत्रिक तपासावरून त्याचे अस्तीत्व पनवेल परीसरात असल्याचे निष्पन्न झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे येवुन आरोपीत शोधासाठी पोलीस मदत मागितल्याने पोलीस पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने आरोपीत याचे प्राप्त लोकेशन नवी मुंबई नियोजित विमानतळ परीसरात येथे आढळुन आल्याने सदर ठिकाणी जावुन कामगार तसेच सिक्युरीटी गार्ड सारखा वेश करून सुमारे दहा हजार कामगारांमधुन कौशल्यपुर्ण शोध घेवुन यातील आरोपीत नामे लोकेशकुमार गिरीराजप्रसाद मिना,वय -36 वर्ष, रा. गाव पाडली खुर्द, ता. तोडाभिम, जि.गंगापुर, राज्य - राजस्थान यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने गुन्हयाची कबूली दिल्याने त्यास अटक करून सदर आरोपीत याचे टन्झीट रिमांड मा. प्रथमवर्ग न्यायालय पनवेल यांच्याकडुन प्राप्त करून पुढील कारवाई करीता राजस्थान येथे नेण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त, नवी मुंबई मिलींद भारंबे, पोलीस सहआयुक्त, नवी मुंबई संजय एनपुरे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 02, विवेक पनसरे, सहा.पोलीस आयुकत , पनवेल विभाग,  अशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे, पनवेल शहर पोलीस ठाणे, बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक प्रशासन,पनवेल शहर पोलीस ठाणे, प्रविण भगत गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहा.पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, प्रकाश पवार , पोना मिथुन भोसले, पोशि किरण कराड, राजस्थान येथील जिल्हा विशेष पथकाचे अधिकारी व अमलदार, एएसआय बहाद्दुर सिंग, कॉन्स्टेबल धारासिंग मिना, कॉन्स्टेबल धनसिंग मिना याच्या पथकाने केली आहे.



फोटो ः आरोपींसह पनवेल शहर पोलीस व राजस्थान पोलीस पथक
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image