आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचा पाचवा वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा...
वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा...
पनवेल / वार्ताहर : -
आगरी कोळी कराडी प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे काम करण्यासाठी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली. लोकनेते दि बा पाटील यांच्या विचारावर चालणाऱ्या या संस्थेचा पाचवा वर्धापन दिवस रविवारी ११ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून पनवेल तालुक्यात साजरा करण्यात आला. ज्यामध्ये समाजातील गरजू गोरगरीब व अनाथ विद्यार्थ्यांच्या आश्रम व शाळेमध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांनी वर्धापन दिन साजरा केला. यामध्ये कसळखंड शिवाजीनगर येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप तसेच पनवेल येथील रॉबिन वूड संस्थेच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप व शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर न्यू पनवेल सेक्टर 6 येतील कमल काटकर चॅरिटेबल ट्रस्टच्या अनाथ आश्रमातील लहान मुलांना जेवण वाटप करण्यात आले.. त्याचबरोबर संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी रोहन लक्ष्मण पाटील कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य  भारत सुभाष भोपी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विश्राम मोहिते
 प्रेम पाटील सहसचिव महाराष्ट्र राज्य किरण पवार  संघटक महाराष्ट्र राज्य रवींद्र घरत रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील अध्यक्ष पनवेल तालुका वृषभ गोंधळी  कार्याध्यक्ष पनवेल तालुका निखिल भोपी उपाध्यक्ष पनवेल तालुका उरण विधानसभा क्षेत्र अंकुर पाटील सचिव पनवेल तालुका प्रणय भोपी  (पनवेल तालुका खजिनदार काळूराम पाटील सल्लागार पनवेल तालुका अनिल घरत उरण तालुका सचिव दर्शन पाटील पाली देवद विभाग अध्यक्ष कसळखंड तसेच कसळखंड ग्रुप ग्रामपंचायत सरपंच संजय घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments