पुढे जाणार्या गाडीला ट्रकची पाठीमागून धडक ; १ ठार ३ जखमी
पनवेल वैभव, दि.19 (संजय कदम) ः पनवेल जवळील आदई गावाजवळील ब्रीज जवळ पुढे जाणार्या वाहनाला भरधाव वेगाने पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गाडीतील एका महिलेचा गंभीररित्या जखमी होवून मृत्यू झाला आहे. तर इतर तीघे जण जखमी झाले आहेत.
पनवेल जवळील आदई गावाजवळील ब्रीज वरुन दिनेश शिंदे (45 रा.नेरुळ) हे त्यांच्या ताब्यातील गाडी क्र.एमएच-12-एचएफ-1789 ही घेवून मुंबई-पुणे महामार्गावरुन मुंबई बाजूकडे जात असताना खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कि.मी.2/650 या ठिकाणी त्यांनी त्यांच्या गाडीचा वेग कमी केला असता पाठीमागून येणारा ट्रक क्र.टीएन-34-झेड-8974 वरील चालकाने वेडीवेल (36 रा.तामिळनाडू) याला ट्रक नियंत्रित न झाल्याने पुढे असणार्या कारला पाठीमागून धडक देवून झालेल्या अपघातात गाडीतील निर्मला जनार्दन शिंदे (62) या गंभीररित्या जखमी होवून मयत झाल्या आहेत. तर दिनेश शिंदे, शिल्पा दिनेश शिंदे व वैष्णव दिनेश शिंदे हे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे पथक, पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे व त्यांचे पथक खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशंकर तसेच आयआरबी पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमींना एमजीएम रुग्णालय कामोठे येथे हलविले त्याचप्रमाणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला असून त्याचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत.
फोटो ः अपघातग्रस्त वाहने