प्रामाणिक रिक्षा चालक सोमनाथ धोत्रे यांचे सर्वत्र कौतुक..
प्रामाणिक रिक्षा चालक सोमनाथ धोत्रे यांचे सर्वत्र कौतुक..
पनवेल / प्रतिनिधी 
रिक्षा चालक म्हटलं कि उद्धट भांडखोर बेशिस्त असे उद्गार काढले जातात . या पलीकडे प्रवाशांची काळजी घेणारा, प्रवाशांचा जीव वाचवणारा, सुखरूप पोहोचवणारा रिक्षा चालक  कोणाला दिसत नाही, अनेक वेळा आपण पाहत आहात रस्त्यावरती अपघात झाले तर रिक्षा चालक धावून येतो हॉस्पिटल ला पोहोचवतो तरी त्याला समाजाकडून चुकीची वागणूक दिली जाते. परंतु रिक्षा चालकांच्या बद्दलची चुकीची भावना आता नागरिकांनी बदलायलाच हवी  तूरळक काही रिक्षावाले सोडले तर रिक्षा चालक हा प्रामाणिक आहे याची प्रचिती नक्की झाली आहे.
नवीन पनवेल येथे राहणारा रिक्षा चालक सोमनाथ धोत्रे  नेहमीप्रमाणे रिक्षा व्यवसाय  नवीन पनवेल अग्निशामक दलाच्या सेक्टर 19 च्या नाक्यावर  रिक्षा व्यवसाय करण्यासाठी उभा होता सदर वेळी प्रवाशी श्रेया जाधव मॅडम या नवीन पनवेल सेक्टर 1मध्ये जाण्यासाठी सोमनाथ धोत्रे यांच्या रिक्षातून प्रवास करत असताना महागडा मोबाईल रिक्षात राहिला होता संपर्क करून लगेंच प्रामाणिक पणे रिक्षा चालक सोमनाथ धोत्रे यांनी परत केला श्रेया जाधव मॅडम यांनी रिक्षा चालकाचे आभार मानले. सोमनाथ धोत्रे यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे
Comments