रक्षाबंधनानिमित्त महिला कार्यकर्त्यांना साड्यांची भेट
पनवेल वैभव, दि.19 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी रक्षाबंधनाच्या पूर्व संधेला आपल्या महिला कार्यकर्त्यांना साड्यांची भेट दिली . नुकताच त्यांचा वाढदिवस हा अनेक सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला होता. त्याचबरोबर त्यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांना ड्रेसचे वाटप केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले हे एस सी कॉलेजचे प्राचार्य गणेश ठाकूर व पेण येथील उद्योजक मयुरशेठ वनगे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे तालुक्याचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व कार्यकर्त्यांनी आगामी पनवेल व उरण विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीला सुरुवात केलेली आहे. रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे हे पनवेल किंवा उरण या दोन मतदार संघापैकी कोणत्यातरी एका मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे.
फोटो ः साड्या वाटप