पावसाळ्यात होणार्‍या मजुरांच्या उपासमारीची सुप्रीम अँगल चॅरिटेबल ट्रस्टने घेतली दखल..
पावसाळ्यात  होणार्‍या मजुरांच्या  उपासमारीची सुप्रीम अँगल चॅरिटेबल ट्रस्टने घेतली दखल 

पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः  दरवर्षी पावसाळ्यात लाखो मजुरांच्या कामाची कोंडी होते . त्यामुळे त्यांच्या घरात अन्नाचा तुटवडा निर्माण होतो . मजुरांसोबत त्यांच्या मुलांची ही उपासमार होते . काही वेळा मजुरांना आपला व कुटुंबातील सदस्यांना स्वतःचा प्राणही गमवावे लागते . मजुरांना होणार्‍या या उपासमारीचा त्रास आणि  अन्नदान श्रेष्ठदान  ही संकल्पना मनात ठेऊन सुप्रीम अँगल चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश ढेकणे आणी त्यांचे मोठे बंधू माणिक ढेकणे यांनी परिसरातील  काही गरजू मजुरांना शिधा वाटप केला . 
या छोट्याशा मदतीने  मजुराची व त्यांच्या मुलाची उपासमार होणार नाही आणि कोणाला ही उपासमारीमूळे प्राणही गमवावे लागणार नाही असे वक्त्यव्य ट्रस्टचे अध्यक्ष गणेश ढेकणे यांनी यावेळी केले आहे.


फोटो ः मजूरांना शिधा वाटप
Comments