पनवेल तालुका पोलिसांकडून बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी नष्ट..
 बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी नष्ट..
पनवेल वैभव, दि.8 (संजय कदम) ः बेकायदेशीररित्या जंगलामध्ये गावठी हातभट्टीची दारु गाळण्याकरिता बेकायदेशीर भट्टी लावून बेकायदेशीर गावठी दारु तयार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष  पथकाने सदर ठिकाणी जावून ही हातभट्टी नष्ट केली आहे.
तालुक्यातील नागपाल यांच्या फार्म हाऊसच्या पश्‍चिम कुंपणाला लागून असलेल्या जंगलातील आंब्याच्या झाडाखाली लहुचीवाडी येथे बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारु गाळण्याकरिता बेकायदेशीर भट्टी लावून बेकायदेशीर गावठी दारु तयार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षद राजपूत, पोलीस हवा.समीर तांडेल, पो.ना.सचिन होळकर, पो.शि.राजकुमार सोनकांबळे, पो.शि.भिमराव खताळ आदींच्या पथकाने सदर ठिकाणी जावून ही हातभट्टी असा मिळून जवळपास 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल व ड्रम नष्ट केला आहे. याबाबत पुढील तपास पो.ना.सचिन होळकर करीत आहेत.


फोटो ः उद्ध्वस्त केलेली हातभट्टी
Comments