विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच माझ्यावर बिनबुडाचे आरोप - प्रभाग क्रमांक ११ चे महायुतीचे उमेदवार हॅप्पी सिंग
विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकल्यामुळेच माझ्यावर बिनबुडाचे आरोप - प्रभाग क्रमांक ११ चे महायुतीचे उमेदवार हॅप्पी सिंग 

पनवेल दि.१२ (वार्ताहर) : विरोधकांच्या पाय खालची वाळू सरकल्यामुळेच माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत असल्याचे मत प्रभाग क्रमांक ११ चे महायुतीचे उमेदवार हॅप्पी सिंग यांनी पत्रकारांशी चर्चा करत असताना सांगितले. पनवेल महापालिका निवडणुकीचे प्रभाग क्रमांक ११ चे महायुतीचे उमेदवार हॅप्पी सिंग यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असल्याचे त्यांनी सांगितले.  
         या प्रभागात हॅप्पी सिंग यांच्यासह नीलम मोहित व प्रदीप भगत हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हॅप्पी सिंग यांनी आत्तापर्यंत कामोठे वसाहतीमधील विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. त्यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित केली कुस्ती स्पर्धा देशभर प्रसिद्ध झाली आहे. त्याचबरोबर समाजकारण, राजकारण या क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या कार्याची दाखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी हॅप्पी सिंग यांना प्रभाग क्रमांक ११ मधून उमेदवारी दिली. या उमेदवारीचे हॅप्पी सिंग चीज करतील असा ठाम विश्वास या विभागातील मतदारांना आहे. त्यामुळे या भागातील विविध राजकीय संघटना सामाजिक मंडळे यांनी त्यांना पाठिंबा दिला असल्याने त्यांच्यासह इतर २ उमेदवारांचा विजय सुद्धा निश्चित मानला जात आहे. निवडणून आल्यास कामोठे वसाहतीमध्ये सुंदर असे एक कुस्ती संकुल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे  स्मारक, कामोठे वसाहती मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच विविध शासकीय योजना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून राबवण्याचा त्यांचा मानस आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये हॅप्पी सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांचे पॅनेलचे पारडे जाड मानले जात आहे. 
फोटो: हॅप्पी सिंग
Comments