स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे विधानसभा निवडणूक लढवणार..
 महेश साळुंखे विधानसभा निवडणूक लढवणार
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत . 
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा महाविकास आघाडीचा जरी घटक पक्ष असला तरी नुकताच महेश साळुंखे यांचा वाढदिवस संपन्न झाला. त्यावेळेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भाई संसारे यांनी रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांची उमेदवारी जाहीर केली . लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महेश साळुंखे यांनी मावळ मतदार संघाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा अतिशय जोमाने प्रचार केला होता.  ज्या ज्या ठिकाणी पनवेल,  उरणमध्ये महाविकास आघाडीच्या सभा झाल्या त्या प्रत्येक सभेमध्ये महेश साळुंखे व त्यांचे कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शवून संजोग वाघेरे यांना निवडून आणण्यासाठी अतीशय परिश्रम व प्रयत्न केले . परंतु विधानसभेला पक्षाचे अस्तित्व टिकवण्याकरता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अध्यक्ष सागर भाई संसारे यांच्या आदेशानुसार महेश साळुंखे हे विधानसभेचे निवडणूक लढवणार आहेत . उरण व पनवेल मतदारसंघ या दोन मतदारसंघापैकी कोणत्यातरी एका मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रचाराची सुरुवात केलेली आहे . लवकरच ते गाव बैठका व नगरपालिका महानगरपालिका हद्दीतील कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन रणनीती आखणार आहेत.  
महेश साळुंखे यांना आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते तसेच ओबीसी समाजाचे कार्यकर्ते विविध सामाजिक संघटना त्याचप्रमाणे डॉक्टरांची संघटना वकिलांची संघटना यांचा पाठिंबा त्याचप्रमाणे अनेक नामांकित बांधकाम व्यवसायिक हे सुद्धा त्यांना या निवडणुकीमध्ये मदत करणार आहेत . पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळाच्या जोरावर त्याचबरोबर वेगवेगळ्या संघटनांच्या पाठिंबाच्या  जोरावर या वेळेला ते या निवडणुकीमध्ये बाजी मारतील असे चित्र दिसत आहे.


फोटो  ः महेश साळुंखे
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image