यशश्री शिंदेच्या मारेक-यांना फाशी द्या ; अन्यथा अशा प्रवृत्तींना जागीच ठेचून काढलं पाहिजे - आ.प्रशांत ठाकूर..
सकल हिंदू समाजाने काढली निषेध रॅली..


पनवेल/प्रतिनिधी  : - उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्येचा सर्वत्र निषेध करत संताप व्यक्त केला जात असताना पनवेलमध्येही सकल हिंदू समाजाने निषेध रॅली काढत मारेक-याला फाशी देण्याची मागणी केली.तर लोकशाहीमध्ये अशा वृत्तीला जागीच शिक्षा देण्याची तरतूद नाही अन्यथा अशा वृत्तीला ठेचून काढले पाहिजे असे संताप आ.प्रशांत ठाकूर यांनी या निषेध रॅलीवेळी व्यक्त केला.
आ.ठाकूर पुढे म्हणाले की, आपण एकत्र जमून शासन व्यवस्थेला जागं करत आहोत.महिलांना वाईट वागणूक देणारे आपल्या समाजात राहिले तर तो समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही.न्याय व्यवस्था आरोपीला शासन करण्याचे काम करेल पण आपण अशा प्रवृत्ती वाढू नयेत म्हणून आपण जागरूक राहिले पाहिजे.लव जिहाद विरूद्ध कठोर कायदा येणे आवश्यक असल्याचे सांगत आपणही यासाठी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे ते शेवटी म्हणाले. तर हा खटला फास्टट्रॅक कोर्टात होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी करू असेही ते म्हणाले. 
सकल हिंदू समाजाचे निलेश पाटील यांनी, पनवेलमधील हिंदू समाज संयमाने राहतो म्हणून प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर तो आक्रमक होण्यास वेळ लागणार नाही असे सांगितले.
ही निषेध रॅली अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून निघून शहराच्या मध्यातून टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रॅलीची सांगता झाली.या रॅलीत ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची विशेष उपस्थिती होती.
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा - ममता प्रितम म्हात्रे
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image