सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल तर्फे वृक्षारोपण उपक्रम संपन्न..
     १५० पर्यावरण पूरक वृक्षांची लागवड ...
पनवेल / वार्ताहर : -
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल तर्फे वृक्षारोपण दि.०७ जुलै २०२४ रोजी नमन बॅटरी ते अमरधाम हायवे सर्व्हिस रोड, पनवेल येथे बकुळ, ताम्हाण, कांचन आपटा, गुलमोहर, कादंब, अर्जुन, सोनचाफा, सातवीण, बदाम अशी देशी पर्यावरण पूरक झाडे लावण्याचा उपक्रम संपन्न झाला. 

सदर उपक्रमांस माजी विरोधी पक्ष प्रमुख प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते प्रथम झाड लावून सुरवात करण्यात झाली. मंडळाचे कार्यकारणी सदस्य, कार्यकर्ते, देणगीदार तसेच पर्यावरण प्रेमी हितचिंतक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन एकशे पन्नास वृक्षांची लागवड केली, सदर वृक्षांची देखभाल सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ करणार आहे, मंडळाचे अध्यक्ष केशव राणे, उपाध्यक्ष सौ प्रिया खोबरेकर, सचिव रामचंद्र मोचेमाडकर, खजिनदार दीपक तावडे, सहखजिनदार बाबाजी नेरूरकर आणि सदस्य, युवा कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन ही झाडे लावून त्यांची देखभाल करणार आहेत. मंडळाच्या सदर उपक्रमांचे पनवेल परिसरात कौतुक होत आहे. आत्ता पर्यंत मंडळातर्फ चारशे पन्नास झाडे लावून मंडळाने निसर्ग संवर्धन कार्य उत्तमरित्या पार पाडले आहे.
Comments