शिवबंधन बांधून शेकडो महिलांनी केला शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश...
शेकडो महिलांनी केला शिवसेनेत शिवबंधन बांधून जाहीर पक्षप्रवेश...

पनवेल वैभव, दि.15 (संजय कदम) ः शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन शिवसेना महिला आघाडीच्या विभाग संघटिका नम्रता शिंदे व शिवसेना उपशहर प्रमुख ज्ञानेश्‍वर भंडारी यांच्या प्रयत्नाने तसेच शिवसेना उपनेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या उपस्थीतीत  नीता खिल्लारे, जयश्री साळवे यांच्या शेकडो महिलांनी शिवबंधन बांधून (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी शिवसेना जिल्हासंघटिका कल्पना पाटील, उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सुजाता कदम, तालुका संपर्क संघटिका प्रमिला कुरघोडे, तालुका संघटिका अनीता डांगरकर, उपतालुका संघटिका  तनुजा झुरे, माजी नगरसेविका लीना गरड, उपमहानगर संघटिका रूपाली कवळे, उपमहानगर संघटिका योजना शिंदे, शहर संघटिका, अपूर्वा प्रभू, शहर संघटिका संपदा धोंगडे, शहर संघटिका सानिका मोरे, शहर संघटिका ज्योति मोहिते, शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, शहर संघटिका संगीता राऊत आदि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



फोटो ः पक्षप्रवेश
Comments