बौद्ध धम्म प्रचार प्रसार समितीचे वर्षावास पहिले पुष्प संपन्न..
पनवेल वैभव, दि.22 (वार्ताहर) ः बौद्ध धम्म प्रचार प्रसार समितीचे वर्षावास पहिले पुष्प आयु. जयश्री मोहिते यांच्या कडे घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. नरेंद्र गायकवाड होते. धम्मगुरू गवळी गुरुजी व आयु. मच्छिंद्र कांबळे बौद्ध धम्म प्रचार प्रसार समिती अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते गौतम बुद्ध, व डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन, परित्राणपाठ, वंदना घेण्यात आली. प्रवचनकार आयु. काशिनाथ गायकवाड यांनी उत्तम प्रवचन केले. बौद्ध धम्म प्रचार प्रसार समितीचे सर्व उपासक, उपासिका उपस्थित होते. आयु. जयश्री मोहिते यांनी रुचकर भोजन दान दिले. सर्वाना आषाढी पौर्णिमा व गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला.
फोटो ः बौद्ध धम्म प्रचार प्रसार समितीचा वर्षावास