पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य महामंडळातील संचित तोटा संदर्भात चौकशी करणेबाबत महामाहीम राष्ट्रपतींना निवेदन..
चौकशी करणेबाबत महामाहीम राष्ट्रपतींना निवेदन

पनवेल / वार्ताहर :-
शुक्रवारी दि. १२ जुलै रोजी सरकारने विधिमंडळासमोर CAG कॅगचा अहवाल मांडला त्यातून राज्य सरकारच्या गलथान कारभाराचे आर्थिक बेशिस्तीचे भयाण वास्तव समोर आले आहे. टेंडर घ्या, कमीशन द्या, या धोरणानुसार कंत्राटदार मित्रांचे खिसे भरण्यासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरु केले, पण त्यातून राज्याचे भले होण्यापेक्षा सरकारच्या मित्रांचेच भले झाले. राज्यात एकूण ११० सार्वजनिक उपक्रम, महामंडळे व कंपन्या आहेत. यातील ४१ महामंडळांचा संचित तोटा ५० हजार कोटींवर गेला आहे. एमएमआरडीए सारखा नफ्यातील उपक्रम कर्जात डुबला आहे. महामंडळांना दिलेले पैसे कुठे खर्च होत आहे ? त्यातून काय कामे झाली याची सखोल चौकशी व्हावी यासाठी आज दिनांक १५ जुलै २०२४ रोजी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने उप विभागीय अधिकारी पनवेल यांच्याकडे निवेदन देण्यात आले. 
सदर कार्यक्रमा प्रसंगी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, वैभव पाटील, कांतिभाई गंगर, सुधीर मोरे, अरुण कुंभार, टी. के. माळी, अमित लोखंडे, चेतन म्हात्रे, आरती ठाकूर, जयश्री खटकाळे, दीपा ढोले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments