रविवारी आरोग्य महाशिबीर; आरोग्य महाशिबिरासंदर्भात डॉक्टरांची बैठक संपन्न ...
अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हे महाशिबिर होत असते. त्या अनुषंगाने यंदाचे १६ वे महाशिबिर आहे. या महाशिबिराच्या अनुषंगाने डॉक्टरांची बैठक पनवेलच्या सुरूची हॉटेलमध्ये झाली.
या बैठकीला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे, डॉ. रमेश पटेल, भाजप शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते. या वेळी महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात विचारविनामय करण्यात आला.