काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने निदर्शने..
     शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने निदर्शने.. 


पनवेल / प्रतिनिधी - : जम्मू कश्मीर डोडा जंगलात दहशदवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात धूमश्चक्री सुरू असून डोडा जिल्ह्यातील डेसा येथील जंगलात शोधमोहीम सुरू असताना दहशदवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात हिंदुस्तानी लष्कराच्या कॅप्टनसह ४ जवान शहीद झाले. भारतीय लष्कराच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पनवेल विधानसभा-१८८ च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल  येथे तिव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शहीद जवानांना मौन धारण करून आदरांजली अर्पण केली. तसेच वीरगती प्राप्त झालेल्या सर्व देशभक्तांच्या समानार्थ रास्ता रोको करून दहशतवादी हल्ले रोखवण्यास अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारच्या निष्ठुर धोरणाविरुद्ध घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.
     यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका प्रमुख संदीप तांडेल, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, उपमहानगर प्रमुख अच्युत मनोरे, प्रभाकर गोवारी, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख रामदास गोवारी, अॅड प्रशांत अनगुडे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका  रेवती सकपाळ, तालुका संपर्क संघटिका प्रमिला कुरघोडे, शहर संघटिका अर्चना कुळकर्णी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments