बिमा व्यापारी संकुलाच्या चेयरमन पदी रामदास शेवाळे यांची फेरनिवड..
लोकाग्रहास्तव पदग्रहण केल्याचे शेवाळे यांचे मत
पनवेल ता.13(बातमीदार) कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारातील बिमा व्यापारी संकुलाची निवडणूक नुकतीच पार पडली होती. बिमा काॅम्पलेक्स मधील मिटिंग हाॅल मध्ये  नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी मीटिंगचे आयोजन शनिवारी  (ता.13)करण्यात आले होते. या वेळी निवडून आलेल्या संचालक मंडळाने सर्वानुमते रामदास शेवाळे यांची तिसऱ्यांदा चेयरमनपदी बिनविरोध फेरनिवड केली आहे.
गेली 17 वर्ष बिमा व्यापारी संकुलाची सेवा करत असून या वेळी सहकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून शेवाळे यांनी या वेळी पद न भूषवण्याची भूमिका घेतली होती परंतु सोसायटीचे सभासद व संचालक मंडळाच्या आग्रहामुळे त्यांनी हे पद स्विकारत असल्याचे सांगितले. वाहतूकदार व लोखंड पोलाद बाजारातील व्यापार्यांची आर्थिक विकासाची गंगोत्री समजल्या जाणाऱ्या बिमाची निवडणूक विरोधी गटाने प्रतिष्ठेची केली होती. त्या मुळे बिमाची निवडणूक अटीतटीची व चुरशीची होईल असा कयास पनवेल मधील राजकीय मंडळींनी बांधला होता. परंतु रामदास शेवाळे प्रणित एकता पॅनल ने हि निवडणूक एकहाती जिंकूण पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे रामदास शेवाळे यांनी भेदभाव न करता सोसायटी मधील सर्व प्रांतातील सभासदांना समान संधी दिली होती. त्या मुळेच एकता पॅनेल चा एकहाती विजय मिळाल्याचे रामदास शेवाळे यांनी बोलून दाखवले 
दरम्यान सोसायटीच्या सचिव पदी वाहतूक व्यावसायिक पुण्यवंत खटकळे तर खजिनदार पदी नारायण फडतरे यांची एकमताने निवड करण्यात आली. किशोरीलाल शर्मा व नारायण आमृले यांना व्हाईस चेयरमन पद देण्यात आले. आबासाहेब लकडे याच्यावर सह खजिनदार व नवनाथ वनवे यांच्यावर सह सेक्रेटरी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बिमाचे नवनिर्वाचित सभासद शैलेश म्हात्रे व बाळासाहेब येळे यांनी नूतन संचालक मंडळाचा सत्कार केला. या वेळी बिमा सोसायटीतचे सभासद चंद्रकांत बागल, बालाजी खोडेवाड, जयेश पार्टे, विजय घोघरे,चंद्रकांत बागल, मनोज मिश्रा, पंचनारायण साहु, कुलदिपसिंग विरदी, सपना कसले, जानकी गिरी उपस्थित होते. तसेच संजय शेडगे,  तुकाराम सरक, अरूण तरंगे, संतोष बागल, निलेश दिसले, श्रीकांत फाळके, महेश गोडसे यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते. लोखंड पोलाद बाजारातील प्रसिद्ध विमा सल्लागार सचिन सपकाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Comments