BCCI कंपनीतील कामगारांना 7000 रुपये पगारवाढ कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची यशस्वी मध्यस्थी...

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची यशस्वी मध्यस्थी...

पनवेल / वार्ताहर   :-  BCCI कळंबोली सिमेंट प्लांट मधील कामगारांचा पगारवाढीचा प्रश्न मागील आठ महिन्यांपासून प्रलंबित होता. मधेच हा प्लांट अदानी ग्रुपने टेकओव्हर केला त्यामुळे व्यवस्थापन बदलले व पगारवाढ करण्यासाठी न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेला संघर्ष करावा लागला. परंतु कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने यशस्वी मध्यस्थी करून कामगारांना 7000 रुपये पगारवाढ मिळवून दिली. त्याच बरोबर महागाई नुसार महागाई भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले आहे. 

कामगार कायद्यानुसार बोनस, दिडलाख रुपयांचा फॅमिली मेडीक्लेम देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या करारामुळे कामगारांमधे आनंदाचे वातावरण आहे. कामगारांनी संघटनेचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Comments