स्व.हरिभाऊ गोविंद चौधरी यांच्या स्मरणार्थ ग्रुप ग्रामपंचायत चौक तर्फे स्वर्गरथाचे लोकार्पण..
ग्रुप ग्रामपंचायत चौक तर्फे स्वर्गरथाचे लोकार्पण..
पनवेल  / प्रतिनिधी - : ३१ मे २०२४ रोजी स्वर्गीय हरिभाऊ गोविंद चौधरी यांच्या प्रित्यर्थ ग्रुप ग्रामपंचायत चौक सरपंच रितु ठोंबरे यांच्या हस्ते स्वर्गरथ लोकार्पण केले. त्याच्यासोबत रा.जि.प माजी सदस्य सुधीर ठोंबरे,आयव्हीएफचे रायगड जिल्हा अध्यक्ष कैलास पोटे, विजय आंग्रे रायगड जिल्हा वैश्य समाज सदस्य, सुरेश (आप्पा) चौधरी आणि अजिंक्य चौधरी, यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास माजी सरपंच सारिका चौधरी, रोहीणी चौधरी, जयश्री चौधरी, आयव्हीएफचे खजिनदार सुनील भोपतराव, राॅबीन चौधरी, स्मितेश चौधरी, राजन चौधरी,प्रणीत चौधरी,राजा चौधरी, गणेश कदम चौक ग्राम पंचायत सदस्य व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
      चौक येथील समाजातील दानशूर व्यक्तीमत्व चंद्रशेखर हरिभाऊ चौधरी अर्थात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे आण्णा चौक येथे स्वर्गरथ लोकार्पण सोहळा संपन्न झाला. स्वर्गीय हरिभाऊ गोविंद चौधरी, स्वर्गीय रमाकांत चौधरी, स्वर्गीय किशोर वासुदेव जगे, यांचे स्मरणार्थ स्वर्गीय हरिभाऊ गोविंद चौधरी यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त स्वर्गरथ लोकार्पण कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.धन दौलत असुन देखील दातृत्व असणारी समाजात फार थोडी माणसं आहेत. परंतु स्वतःच्या तुटपुंज्या कमाईतला वाटा समाजाला देणारे  आण्णा चौधरी हे एक समाजात नांव आहे. लोकसेवेसाठी आपले जीवन अर्पण करणारे आण्णा यांनी स्वखर्चातून बनविलेला स्वर्गरथ ( वैकुंठ रथ) अनेक सामान्य, गोरगरिबांची, अंत्ययात्रा निर्विघ्न पार पडेल यात शंका नाही.बचंद्रशेखर गोविंद चौधरी आण्णा यांचा मंडप डेकोरेशन व्यवसाय असणारे आण्णा मदतीसाठी नेहमीच धावुन जातात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आई वडिलांच्या स्मरणार्थ वातानुकूलित ॲब्युलन्स देखील लोकार्पण केली.आण्णांचा आदर्श समाजाने घेण्यासारखा आहे. आण्णांचे  समाजकार्य अतिशय चांगले आहे.ते कार्य अखंड कार्यरत राहो हीच खरी भाऊंना श्रद्धांजली ठरेल.
Comments