प्रभाकर कांबळे यांची आरपीआयच्या पनवेल महानगरपालिका क्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती..
पनवेल महानगरपालिका क्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती
पनवेल वैभव / प्रतिनिधी - : आरपीआयचे प्रभाकर कांबळे यांची पनवेल महानगरपालिका क्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे यांनी केलेल्या नियुक्तीचे पत्र रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. 
    
नवीन पनवेल येथे राहणारे प्रभाकर कांबळे यांनी काही महिन्यांपूर्वी आरपीआय मध्ये स्वगृही प्रवेश केला. आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि गेल्या 30 वर्षांपासून अधिक काळ आंबेडकरी चळवळीत कार्य केलेले प्रभाकर कांबळे यांची महानगरपालिका क्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्यावर आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या कार्याचा आवाका, जनसंपर्क, चळवळीशी प्रामाणिकता पाहता त्यांच्यावर पनवेल महानगरपालिका क्षेत्र अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी कांबळे यांनी स्वीकारली आहे. यावेळी पक्ष वाढवण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Comments