कळंबोलीत व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स शोरूम चे अभिनेते दिलीप जोशी (जेठालाल) यांच्या हस्ते भव्य शुभारंभ...
अभिनेते दिलीप जोशी(जेठालाल)यांच्या हस्ते भव्य शुभारंभ...
 
पनवेल वैभव /(नवी मुंबई) :-
विनोदी मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता दिलीप जोशी अर्थात जेठालाल शनिवारी कळंबोलीकरांच्या भेटीस आला होता. निम्मित होते ते कळंबोली येथील प्रसिद्ध व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स शोरूम च्या भव्य अश्या स्वरूपात नवीन पत्त्यावर स्थलांतरित होत असलेल्या शुभारंभ सोहळ्याचे. शनिवारी व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स चे नवीन शोरूम ग्राहकांच्या सेवेत रुजू होत असताना नागरिकांची अलोट गर्दी जमली होती. या उद्घाटन सोहळ्यास अभिनेता दिलीप जोशी, उद्योजक विजय कक्कड,व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स चे संचालक मोहित कक्कड , मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड इतर मान्यवर उपस्थित होते. या शोरूम चा नवीन पत्ता रेजेन्सी एलेंजा सीएचएस,  सेक्टर १० ई, कळंबोली, पनवेल हा आहे. या उद्घाटन सोहळ्यास पनवेलकरांना यावेळी विविध ऑफर याचबरोबर दिलीप जोशी यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली. या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने कक्कड कुटुंबियांचे शुभचिंतक शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित होते या मध्ये कामधेनू बिल्डर्सचे सतीश सबलोक, रोनक ऍडव्हर्टाजिंग चे अमरदीप सिंग, पोलीस अधिकारी सतीश गायकवाड व उद्योग क्षेत्रातील इतर नामवंत व्यक्ती यावेळी उपस्थित होते.

 याबाबत अधिक माहिती देताना संचालक मोहित कक्कड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की "१९८८ पासून आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत आहोत. ग्राहकांच्या सहकार्यामुळेच आज आम्ही मोठ्या जागेत शोरूम सुरुवात करून निरंतर उत्तम सेवा देणार आहोत. या ठिकाणी दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने ग्राहकांकरिता योग्य भावात उपलब्ध असतील. तसेच वेळोवेळी विविध ऑफर सुद्धा असतीलच पनवेलकर तसेच नवी मुंबई, ठाणे येथील ग्राहकांनी आमच्या शो रूमला आवर्जून एकदा भेट द्यावी.

 अभिनेता दिलीप जोशी (जेठालाल) यांनी व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स शोरूम ला शुभेच्छा दिल्यात ते आपल्या भाषणात बोललेत "मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स शो रूम खुप यशस्वी होवो, ग्राहकांना या ठिकाणी खरेदी केल्यावर संतोष मिळो. पनवेलकर जनतेचे प्रेम बघून मी भारावून गेलो आहे.आपण सर्व असेच हसत रहा, आनंदी रहा व आपल्या आईवडिलांची सेवा करा.
Comments