संजोग वाघेरे पाटील यांचा ३ मे रोजी पनवेलमध्ये झंजावाती प्रचार दौरा ..
मतदार संघ पिंजून काढत प्रचार करत असल्यामुळे प्रस्थापितांच्या उरात धडकी


पनवेल / वार्ताहर  : -        
"विद्यमान खासदार दाखवा आणि हवे ते जिंका" अशी परिस्थिती असलेल्या मायक्रो लोकालिटी मध्ये संजोग वाघेरे पाटील थेट भिडत झंजावाती प्रचार करत असल्यामुळे प्रस्थापितांच्या उरात धडकी भरली आहे. 
शुक्रवार दिनांक ३  मे रोजी संजोग वाघेरे पाटील यांचा पनवेल विधानसभा मतदारसंघातील विद्यमान खासदारांकडून दुर्लक्षित झालेल्या क्षेत्रामध्ये झंजावाती प्रचार दौरा होणार आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची खंबीर साथ संजोग वाघेरे पाटील यांना लाभत असल्यामुळे पनवेल परिसरात शुक्रवारी पुन्हा एकदा संजोग वाघेरे पाटील यांचा दणदणीत आवाज घुमणार यात जराही दुमत नाही. 
           १८ व्या लोकसभेसाठी ३३ मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत रोचक वळणावर येऊन ठेपली आहे. विद्यमान खासदार या ठिकाणी दहा वर्ष खासदार म्हणून दोन टर्म सत्ता उपभोगून देखील जर त्यांना जिंकण्यासाठी डमी उमेदवाराच्या  कुबड्या घ्याव्या लागत असतील तर मग यांनी दहा वर्षात नेमके केले काय ? असा सूर जनमानसातून उमटत आहे. त्यातच महाविकास आघाडीचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा थेट तळागाळापर्यंत पोहोचत होणारा सूत्रबद्ध प्रचार विद्यमान खासदारांच्या उरात धडकी भरवत आहे. याच पार्श्वभूमीवर ३ मे रोजी त्यांचा झंझावती दौरा विशेष लक्षवेधी ठरणार आहे. 
         सकाळी दहा वाजता या प्रचार दौऱ्याला तळोजे पांचनंद  येथून प्रारंभ होईल. त्यानंतर तोंडरे गाव येथे प्रचार बैठक संपन्न होईल. त्या नंतर नवीन पनवेल, कळंबोली, खारघर येथील गुरुद्वारांमध्ये शिख बांधवांसोबत गाठीभेटी घेऊन तसेच गुरुद्वारा यामध्ये नतमस्तक झाल्यानंतर संजोग वाघेरे पाटील खांदा कॉलनी येथील स्वर्गीय शाम म्हात्रे हायस्कूलमध्ये कामगार मेळाव्याला संबोधित करतील.
           त्यानंतर पनवेल मोहल्ला,कोळीवाडा, पनवेल शहर झोपडपट्टी ,खांदा कॉलनी ,कामोठे येथील विस्टा कॉर्नर, कामोठे मध्ये एम एन आर स्कूल, मनमोहन स्वीट चौक,पोलीस स्टेशन चौक, कोपरा गाव,बेलपाडा गाव, नवरंग हॉटेल सेक्टर १२, महाकाली मंदिर सेक्टर १८, घरकुल स्पेगिटी, मुरबी गावातील हनुमान मंदिर, सेक्टर २० मधील हावरे कॉर्नर आणि अखेरीस ओवे गाव या ठिकाणी या प्रचार दौऱ्याची सांगता होईल. 
        संजोग वाघेरे पाटील यांच्या समोरील मशाल निशाणी असलेले बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा अशा स्वरूपाचा प्रचार करण्यासाठी हा झंजावाती दौरा महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेते व पदाधिकारी यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ,समाजवादी पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी व तमाम मित्र पक्षांचे नेते व पदाधिकारी या दौऱ्यामध्ये संजोग वाघेरे पाटील यांच्या समवेत उपस्थित राहणार आहेत.
Comments