१५ वर्षांपासून होणाऱ्या गुडघेदुखीवर जोडप्याने केली यशस्वी मात..
ऑस्टियोआर्थराइटिसशी झुंज यशस्वी - खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया 

नवी मुंबई: गंभीर ऑस्टियोआर्थरायटिसचा सामना करत असलेल्या वयस्कर जोडप्यावर नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्स गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. दीपक गौतम(संचालक -जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक डिसिप्लन्स, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नाने ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडत या जोडप्या कायस्वरुपी वेदनेपासून मुक्त केले. या प्रक्रियेनंतर या वयस्कर जोडप्याला कोणाच्याही आधाराशिवाय दैनंदिन कामं करता येऊ शकतात. या जोडप्याच्या मुलाने आपल्या पालकांसाठी हा शस्त्रक्रियेचा अनोखा निर्णय घेत सर्वांसमोर आदर्श निर्माण केला.

80 वर्षीय रुग्ण श्री सी.व्ही. शास्त्री आणि 75 वर्षीय रुग्ण श्रीमती सी. भाग्यलक्ष्मी यांना गेल्या 15 वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होता तसेच त्या आधाराशिवाय चालू शकत नव्हत्या. त्यांनी विविध डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि गुडघ्यांमध्ये अनेक इंजेक्शन्सदेखील घेतले मात्र त्याचा फारसा फरक पडला नाही. त्यांचा मुलगा सी.एम. विजयकुमार, नवी मुंबई येथील बँकिंग व्यावसायिक याने त्याच्या पालकांना नवीन जीवन देण्यासाठी सोशल मीडियाद्वारे मेडिकवर हॉस्पिटलशी संपर्क साधला.

डॉ. दीपक गौतम(संचालक -जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक डिसिप्लन्स, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) सांगतात की, हे जोडपे मुलाचा आधार घेऊन हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता आले होते. त्यांच्या एक्स-रे मध्ये गुडघ्यांमध्ये झालेले बदल दिसून आले. त्यांची क्लिनिकल चाचणी आणि एक्सरे अहवालानुसार त्यांना गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. अशा शस्त्रक्रियांसाठी वय ही एक स्वतंत्र जोखीम घटक आहे, परंतु त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्यापुढे कोणतेही पर्याय शिल्लक नव्हते. सुदैवाने त्यांचा रक्तदाब आणि साखरेची पातळी नियंत्रणात होती तसेच कोमॉर्बिडीटीज नसल्याने भूलतज्ज्ञांना आणखी आत्मविश्वास आला.

डॉ. गौतम पुढे सांगतात की, दोन्ही जोडप्यांचे यशस्वी टोटल नी रिप्लेसमेंट (TKR) पार पाडले आणि त्याच दिवशी त्यांना घरी देखील सोडण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी हे जोडपे वेदनामुक्त हलचाली करु शकत होते तसेच आधाराशिवाय चालू शकत होते. रुग्णालयाची ऍनेस्थेसिया टीम, आयसीयु टीम, नर्सिंग स्टाफ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या फिजिओथेरपी टीमने या जोडप्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी अतिशय प्रयत्न केले.

भूल देणे  हे एक आव्हानात्मक काम आहे.रूग्णांमध्ये कॉमॉर्बिडीटीज असल्यास प्रत्येक अवयवाचे कार्य कमी होते आणि शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या वेदना, बरे होतानाच्या प्रवासात काही आव्हानांचा सामना करावा लागतो. एपिड्युरल, स्पाइनल ऍनेस्थेसिया, नर्व्ह ब्लॉक्स सारख्या शस्त्रक्रियेदरम्यान आणि शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना कमी करण्यास मदत करण्यात योग्यरित्या भूल देणे गरजेचे असते अशी प्रतिक्रिया डॉ जयश्री व्यंकटेशन(सल्लागार भूलतज्ज्ञ, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) यांनी व्यक्त केली.

माझ्या पालकांना होणाऱ्या चालण्यासंबंधी समस्या तसेच त्यांना होणाऱ्या वेदना पाहिल्यानंतर यावर कायस्वरुपी उपाय मिळावा असे मला वाटत होते. मेडीकवर  हॉस्पिटलमध्ये मला आशेचा किरण मिळाला आणि माझ्या पावकांना यापुढे वेदनारहीत आयुष्य जगता येणार आहे यासाठी रुग्णालयाचे मी विशेष आभार मानतो अशा प्रतिक्रिया त्यांचा मुलगा श्री सी.एम. विजयकुमार यांनी व्यक्त केली.

आमच्या मुलाच्या आधाराने आणि मेडीकवर हॉस्पिटल्सच्या प्रभावी उपचारांनी आज आम्हाला वेदनेपासून मुक्त केले आहे. या अडचणीच्या काळात  आमच्या मुलाने आमची खुप काळजी घेतल्याची प्रतिक्रिया रुग्ण श्री सी.व्ही. शास्त्री यांनी सांगितले.
Comments