महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
पनवेल / दि.११ जुलै :
आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार ,अतिक्रमण उपायुक्त रविकिरण घोडके व प्रभाग क कामोठेच्या सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 11 जुलै रोजी पनवेल मधील बावन बंगला परिसरातील सुशील गार्डन समोरील अनधिकृत बांधलेल्या बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण विभागाच्यावतीने ही तोडक कारवाई करण्यात आली.
यावेळी प्रभाग अधिक्षक दशरथ भंडारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी,सुरक्षा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तसेच पोलिस विभागाचे कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, फायरबिग्रेडचे कर्मचारी उपस्थित होते.