पनवेल वेस्ट वॉरियर्स तर्फे स्वच्छ, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महत्त्वाच्या बाबींचे विवरण....
पनवेल वेस्ट वॉरियर्स तर्फे स्वच्छ, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महत्त्वाच्या बाबींचे विवरण



पनवेल  : - 
गणेशोत्सव जवळ आला की, प्रत्येक घरात उत्साहाची लगबग सुरू होते. घरसाफसफाई, सजावट, मूर्ती आणण्यापासून ते प्रसाद बनवण्यापर्यंत अनेक तयारी होत असतात. मात्र या सणात आपण पर्यावरणाची जबाबदारी देखील लक्षात घेतली पाहिजे. पुढील काही गोष्टी लक्षात ठेवून आपण अधिक सजग आणि हरित गणेशोत्सव साजरा करू शकतो: ---

🌱 घरसाफसफाई करताना अनावश्यक वस्तूंचं रिसायकलिंग करा:-
# गणपतीपूर्वी आपण घरभर स्वच्छता करतो, जुनं सामान टाकतो. यावेळी "कचरा" समजून टाकण्याऐवजी वापरण्यायोग्य वस्तू रिसायकलिंगसाठी पाठवा.
# जुने कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लास्टिक सामग्री रिसायकल केंद्रात द्या.
# काही वस्तू गरजूंसाठी उपयुक्त ठरू शकतात – स्थानिक सामाजिक संस्थांना दान करा.
# आपले घर स्वच्छ! व पर्यावरणही सुरक्षित!!
🌿 पीओपी आणि शाडूच्या मूर्ती टाळा – मातीच्या मूर्ती निवडा:-
# प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत आणि जलस्रोत प्रदूषित करतात.
शाडूची मूर्ती नैसर्गिक असली तरी ती देखील खूप वेळाने विरघळते.
✅ आता बाजारात 100% मातीच्या मूर्ती सहज उपलब्ध आहेत – या मूर्ती घरच्या घरी विसर्जनासाठी उत्तम आहेत.
🍃 सजावटीसाठी नैसर्गिक घटक वापरा:-
मखर व सजावटीचं सामान प्लास्टिकचं नसून कागद, कापड, फुलं, पाने अशा नैसर्गिक घटकांपासून बनवा.
# LED लाइट्सऐवजी मृण्मय दिवे, पणत्या व समई वापरण्याचा विचार करा.
# यामुळे कचरा कमी होतो आणि घरातही प्रसन्न वातावरण राहते.

🍽️ प्लास्टिक आणि थर्माकोलच्या थाळ्यांना नकार:-
गणपती उत्सावाच्या जेवणात प्लास्टिक वा थर्माकोलच्या प्लेट्स वापरल्यास, 
पर्यावरण हानी होते.
आरोग्यावरही परिणाम होतो.
✅ त्याऐवजी सुपारीच्या पानांच्या, उसाच्या चोथ्याच्या पत्रावळी, स्टील, तांब्याच्या थाळ्या वापरा – पारंपरिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक!
🎁 प्रसाद आणि फराळ देताना प्लास्टिक टाळा:-
प्रसाद वा फराळ देताना बहुतेकजण प्लास्टिकच्या पिशव्या वापरतात, पण
त्या पुन्हा वापरण्यायोग्य नसतात.
अनेकदा त्या आजार पसरवतात.

✅ पर्याय:-
कागदात बांधून द्या.
स्टीलच्या छोट्या डब्यांत द्या – हे अधिक स्वच्छ आणि सुरक्षित!
🌊 घरच्या घरी मूर्ती विसर्जन करा – माती पुन्हा कुंभाराला द्या
घरच्या घरी कुंडीत, बाल्कनीत, बागेत अथवा टाकीत विसर्जन करा. 
विसर्जनानंतर, जी माती तळाशी राहते ती कुंभाराला परत द्या.
त्यामुळे पुढील वर्षी ती माती पुन्हा वापरता येते – हीच खरी शाश्वत परंपरा!
💚 एक सुजाण भक्त म्हणून आपली जबाबदारी
गणेशोत्सव म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर आपल्या संस्कृतीची आणि पर्यावरणाची जपणूक.
"बाप्पा मोरया" म्हणताना भविष्यातील पिढ्यांसाठीही पृथ्वी सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.
🙏 या वर्षी गणेशोत्सवात सजगपणा आणि शुद्ध पर्यावरणाची जोड द्या! 🙏

प्राजक्ता शाह
पनवेल वेस्ट वॉरियर्स 
9167112553
Comments