रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या अध्यक्षपदी निलेश पोटे यांची वर्णी
पदग्रहण समारंभासाठी आ. प्रशांत ठाकूर व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे यांची विशेष उपस्थिती
पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या अध्यक्षपदी निलेश पोटे यांची वर्णी लागले असून सचिवपदी हितेश राजपूत हे सन २०२५- २६ ची धुरा सांभाळणार आहेत . या पदग्रहण समारंभासाठी आ. प्रशांत ठाकूर व डिस्टिक गव्हर्नर संतोष मराठे यांची विशेष उपस्थिती लाभली होती .
रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या २०२५ - २६ च्या अध्यक्षपदी निलेश पोटे व सचिवपदी हितेश राजपूत यांनी पदभार स्वीकारला सदर कार्यक्रम रोटरी कोम्मुनिटी सेंटर नवीन पनवेल येथे मोठ्या थाटात संपन्न झाला . या कार्यक्रमात आ. प्रशांत ठाकूर व डिस्टिक गव्हर्नर संतोष मराठे, डॉ. स्वाती लिखिते यांची विशेष उपस्थिती होती. रोटरी क्लबच्या परंपरेनुसार हा कार्यक्रम संपन्न होत असताना मागील वर्षाचे अध्यक्ष चारुदत्ता भगत व सचिव तुषार तटकरी यांनी आपला पदभार नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश पोटे व सचिव हितेश राजपूत यांच्याकडे सुपूर्द केला . यावेळी शुभेच्छा देताना आ. प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, रोटरीचे कार्य हे तळागळातील तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी होत असते मी सुद्धा या रोटरीचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे . पनवेलच्या विकासाच्या दृष्टीने रोटरीचा सहभाग आज ही महत्चाचा आहे . माझ्याकडून वेळोवेळी रोटरीला आवश्यक असणारी मदत करत असतो व यापुढे सुद्धा नियमित करत राहू असेही त्यांनी सांगितले . तर डिस्टिक गव्हर्नर संतोष मराठे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की रोटरीचा विस्तार संपूर्ण जगात वाढत चालला आहे . आज देशभरातून अनेक जण रोटरीचे सदस्य होत असल्याचा मला अभिमान आहे . रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात व त्यात नावीन्य असते या पुढे सुद्धा नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश पोटे व सचिव हितेश राजपूत हे अश्याच प्रकारे वेगवेगळे उपक्रम राबवून रोटरीचे नाव उंचावतील यात शंका नसल्याचे त्यांनी सांगितले . या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश पोटे यांनी सांगितले की मला मिळालेल्या संधीचे सोने करून रोटरी क्लब चे नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यात उंचावेल अश्या प्रकारचे उपक्रम माझ्या कारकीर्ती मध्ये राबवू असे त्यांनी सांगितले . या कार्यक्रमात डॉ. प्रमोद गांधी , अरविंद सावळेकर , वर्षा प्रशांत ठाकूर, डॉ. जयश्री पाटील , डॉ. प्रकाश पाटील , काशिनाथ पोटे ,प्रमोद वालेकर , संजय जैन,गुरुचरण कोहली, पोटे कुटुंबिय या प्रमुख मान्यवरांसह रोटरी सदस्य , रोटेरियन आदी उपस्थित होते .
फोटो - रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या अध्यक्षपदी निलेश पोटे यांची वर्णी