शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी 


पनवेल वैभव / दि.१६ ( वार्ताहर ) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )ग्राहक संरक्षण कक्षातर्फे पनवेल परिसरात  घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी तसेच  घरगुती गॅस सिलेंडरचा होणारा काळाबाजार रोखण्याची मागणी विविध एजन्सीच्या ठिकाणी जाऊन करण्यात आली आहे . 
             पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अध्यक्ष अनिल देसाई  यांच्या आदेशानुसार आखाती देशातील युद्धामुळे आपल्या विभागात इंधनाचा तुटवडा निर्माण होत असल्याने घरगुती गॅस ची कमतरता ग्राहकांना भासत असल्याचे निदर्शनास येत आहे. 
सदर गोष्टीचा गैरफायदा घेत काही गॅस एजन्सी किंवा जे गॅस डिलिव्हरी देतात असे गॅस सिलिंडर चा काळाबाजार करण्याची दाट शक्यता आहे तरी आपल्या एजन्सी कडून अश्या प्रकारे कुठलीही गोष्टी होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी व ग्राहकांना चालू दरातच सिलिंडर देऊन प्रामाणिक सेवा पुरवावी अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे कक्ष जिल्हासंघटक शशिकांत डोंगरे, उपजिल्हासंघटक सुनित पाटील, कामोठे शहरसंघटक भरत शिंदे, कुणाल कुरघोडे, पळस्पे जिल्हा परिषद संघटक अनंता सांगडेकर, खांदा वसाहत उप शहर संघटक प्रसाद परब, उपशहर संघटक  विजय कोलते आदींनी या संदर्भात पनवेल भारत गॅस सर्व्हिस - पनवेल  , एच. पी . गॅस एजन्सी- नवीन पनवेल  ,श्री साईराम गॅस एजन्सी कळंबोली ,आर .डी .एच .पी.गॅस एजन्सी खांदा वसाहत ,श्री साईराम भारत गॅस एजन्सी कामोठे, श्री साईराम गॅस एजन्सी खारघर आदी ठिकाणी संबंधित मालकांशी भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे . 


फोटो - शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे गॅस एजन्सी कडे मागणी
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न ...
Image