प्रचाराच्या अंतिम टप्प्यातही महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा जोरदार प्रचार ; खासदार श्रीरंग बारणे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खासदार श्रीरंग बारणे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 


पनवेल (प्रतिनिधी)  महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल विधानसभा मतदार संघात श्रीरंग बारणेच्या वाढत्या लोक्रप्रियतेमुळे या रोड शोला तरुणांसह महिला आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येत्या सोमवारी १३ मे तारखेला मतदान असल्याने प्रचाराचा अंतिम टप्प्यातील प्रचाराला वेग आला होता.  त्या अनुषंगाने खारघरमध्ये भव्य रोड शोचे आयोजन महायुतीच्या वतीने करण्यात आले होते.
       या रोड शोमध्ये विजयरथावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, शिवसेनचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, 
माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उपस्थित होते. या रोड शो मध्ये अनेक तरुण भव्य बाईक काढून सहाभागी झाले होते. प्रत्येक ठिकाणी श्रीरंग बारणे यांचा मतदारांनी फुलांनी उधळन करत तसेच ठिकठिकाणी क्रेनच्या सहाय्याने भव्य हार त्यांगळ्यात घालून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. हा रोड शोला खारघरपासून सुरुवात झाली असून संपुर्ण कळंबोली परिसरात काढण्यात आला. या वेळीही मतदारांनी त्याच जल्लेषात स्वागत करण्यात आले. या रोड शोची सांगता कळंबोलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेच्या ठिकाणी झाली. या रोडशो दरम्याना महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करत मावळ मतदार संघातून श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्रीक करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या वेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, कळंबोली शहर अध्यक्ष रवीनाथ पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल महपालिकेचे माजी स्थायी सभापती अमर पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, अभीमन्यु पाटील, निलेश बाविस्कर, शत्रृघ्न काकडे, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, माजी नगरसेविका आरती नवघरे, नेत्रा पाटील, संजना कदम, भाजपचे खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हा 
अध्यक्ष महादेव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख परेश पाटील, तालुका संपर्क प्रमुख रुपेश ठोंबरे, मनसेचे राहुल चव्हाण, विवेक बोराडे, राष्ट्रवादीचे सचिन कुंभार, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रिया मुकादम, कुंदा गोळे, विजय पाटील, गीता चौधरी, महिला मोर्चाच्या साधना पवार, किरण पाटील, संतोष शर्मा, परेश पाटील, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर, अमर ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
             मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा चौफेर प्रचार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार झाला.  प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही पनवेलच्या ग्रामीण भागात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रचार दौरा करून खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्ट्रिक करण्याचे आवाहन मतदारांना केले.
              पनवेल विधानसभा मतदारसंघातील खुटारी, रोहिंजण, किरवली, धानसर, धरणा, धरणा कॅम्प, पिसार्वे, तुर्भे, करवले, तळोजे मजकूर, कोयनावेळे, घोट, पडघे, कानपोली, वलप, पाले बुद्रुक, कोळवाडी, वळवली, टेंभोडे, नेवाळी, आदई, आकुर्ली, हरिग्राम-केवाळे, विहिघर, सुकापूर, देवद, उसर्ली आणि विचुंबे गावात प्रचार पत्रकांचे वाटप करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती मतदारांना देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या प्रचारावेळी भाजपचे मावळ लोकसभा निरीक्षक सुनील कर्जतकर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, संतोष भोईर, महादेव मधे, भाजप अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष व माजी जि.प. सदस्य अमित जाधव, माजी पं.स. माजी सदस्य भूपेंद्र पाटील, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील, उपसरपंच दिवेश भगत, ग्रामपंचायत सदस्य चेतन केणी, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, भाजप नेते प्रल्हाद केणी, निर्दोष केणी, पडघे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा पाटील, विनोद पाटील, दशरथ म्हात्रे, शिवसेनेचे पनवेल तालुकाप्रमुख रूपेश ठोंबरे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस दिनेश खानावकर, संतोष आगलावे, राजेश पाटील, सुनील पाटील, विश्वजीत पाटील, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, राम पाटील, राजेश काथारा, महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर, प्रमोद भगत, पिंटू काथारा, मोतीराम काथारा, सुभाष भोईर, के.के. कडव, अशोक गडगे, रूपेश फुलोरे, भास्कर फुलोरे, हरिदास फुलोरे, नंदू म्हात्रे, पांडुरंग पाटील, रविकांत म्हात्रे, सचिन पाटील, महादेव गडगे, नितेश पाटील, महेश पाटील, नाथा आगलावे, दीपक उलवेकर, अंकुश पाटील, नवनाथ खुटारकर, बुधाजी मोरावकर, महेश पाटील, निलेश वाघमारे, वामनशेठ वाघमारे, धनंजय म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, रमेश पाटील, धनंजय पाटील, आनंदबुवा पाटील, महादू शेळके, रमेश काकडे, प्रमोद भिंगारकर, बळीराम पाटील, किशोर सुरते, आलुराम केणी, अविनाश गायकवाड, अनंता गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
Comments