करंजाडेत बुद्धजयंती निमित्ताने आयोजित महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगला..
 महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगला..

पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः तथागत गौतम बुद्धजयंतीनिमित्त प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे यांच्या विद्यमाने महिलांसाठी खेळ खेळूया पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात बौध्दचारी जगताप यांनी बुद्धवंदनेनी केली. आणि त्या आलेल्या पाहुण्यांच्या संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमास आंबेडकरी चळवळीतीचे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी सांगितले की, करंजाडे व वडघर या भागात खर्‍या अर्थाने जर कोणी चळवळ चालवत असेल ते म्हणजे कुणाल लोंढे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असो विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून होणारे सामाजिक काम करत आहे. त्यांचे कौतुक करू तेवढे कमी आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षक ठरले. सिने अभिनेते जयवंत भालेकर यांच्या विनोदी शैलीने करंजाडेकरांची मनोरंजन करण्यात आली. असे उपक्रम सामाजिक संस्था माध्यमातून नेहमी राबवत राहो अशी इच्छा करतो मी व्यक्त करतो जयवंत भालेकर यांनी केले. खेळ खेळूया पैठणीचा विशेष कार्यक्रमाचे निवेदन दिग्दर्शक विशाल सावंत यांनी केले. महिलांसाठी विविध खेळ घेऊन महिलांचे मनोरंजन केले. महिलांसाठी पैठणी व विविध बक्षिस देण्यात आले आहे. या वेळी सर्व महिलांनी प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे विशेष आभार व संस्थेचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



फोटो ः पैठणीचा खेळ
Comments