पनवेल परिसरातील बार, वॉईन शॉप व पब वर पोलिसांसह दारु बंदी विभागाचे लक्ष..
       पोलिसांसह दारु बंदी विभागाचे लक्ष

पनवेल, दि.27 (संजय कदम) ः पुण्यात घडलेल्या ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या घटनेची पुनरावृत्ती पनवेल परिसरात होवू नये यासाठी परिमंडळ 2 हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यामध्ये असलेले बार, वॉईन शॉप व पब वर पोलिसांसह दारुबंदी विभागाचे कडक लक्ष आहे.
पुण्यातील घटनेमुळे पोलिसांसह दारुबंदी विभाग, आरटीओ आता सतर्क झाले असून बार, वॉईन शॉप व पब मध्ये अल्पवयीन मुलांवर नजर ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रात्रभर सुरू असणार्‍या डान्स बार वर सुद्धा पोलिसांचे लक्ष आहे. तसेच बाजारात येणार्‍या नवनवीन महागड्या गाड्या यांनी अधिकृत शासकीय परवाने घेतले आहेत का? याकडे आरटीओ विभागाचे लक्ष आहे. त्या दृष्टीने आता रात्रीच्या वेळी वाहन तपासणी, नाका बंदी, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह सारख्या केसेस करण्याकडे पोलिसांचे आता विशेष लक्ष आहे.

फोटो : संग्रहित
Comments