मावळ लोकसभा मतदार संघात एकूण ५२.९ टक्के मतदान..

मावळ लोकसभा मतदार संघात एकूण ५२.९ टक्के मतदान..


पनवेल /वार्ताहर  :- 
मावळ लोकसभा मतदार संघात आज निवडणूक पार पडली आहे. महायुतीकडून श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यात थेट लढत झाली आहे. आज एकूण ६ वाजेपर्यंत या मतदारसंघात ५२.९ टक्के एवढे मतदान झाले आहे. दरम्यान सकाळी ९ वाजेपर्यंत ५.३८ %, सकाळी ११ वाजेपर्यंत १४.८७%, दुपारी १ वाजेपर्यंत २७.१४ %, दुपारी ३ वाजेपर्यंत ३६.५४ %, तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४६.०३ % एवढे मतदान झाले होते.

पनवेल – ४९.२१ %
कर्जत – ६०.१२ %
उरण – ६४.७५ %
मावळ – ५३.०२ %
चिंचवड – ४९.४३ %
पिंपरी – ४८.२५ %
(मावळ लोकसभा मतदारसंघात ६ वाजेपर्यंत एकूण मतदान टक्केवारी – ५२.९ %)
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या संपुर्ण लोकसभा कार्यक्षेत्रात २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून यामध्ये १३ लाख ४९ हजार १८४ पुरूष मतदार, १२ लाख ३५ हजार ६६१ महिला मतदार आणि १७३ तृतीयपंथी मतदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. या मतदारसंघात ३३ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात आहेत. 
त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८१६ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image