पुराणकालीन शिव मंदिर जीर्णोद्धार करताना सापडल्या गणपती बाप्पा, कार्तिकेय आणि शिवलिंग यांच्या पुरातन मुर्त्या..
पुराणकालीन शिव मंदिर जीर्णोद्धार करताना सापडल्या गणपती बाप्पा, कार्तिकेय आणि शिवलिंग यांच्या पुरातन मुर्त्या..
पनवेल वैभव दि. १ ( संजय कदम  ) :  पनवेल तालुक्यातील श्री क्षेत्र तळोजा मजकूर येथील पुराणकालीन शिव मंदिर जीर्णोद्धार करत असताना त्या ठिकाणी खोदकाम करताना गणपती बाप्पा, कार्तिकेय आणि शिवलिंग यांच्या पुरातन मुर्त्या सापडल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
प्रभू श्रीराम नवमीच्या पवित्र दिनाच्या निमित्ताने शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी शिव मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. 
श्री क्षेत्र तळोजा मजकूर येथील पुराणकालीन शिव मंदिर जीर्णोद्धार आणि पूजन गुरुवर्य यशवंत महाराज यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील , उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील ,भाजप नेते प्रल्हाद केणी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते , यावेळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी शिव मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करत असताना त्या ठिकाणी गणपती बाप्पा, कार्तिकेय आणि शिवलिंग यांच्या पुरातन मुर्त्या सापडल्याची माहिती बबनदादा पाटील यांनी दिली. त्यानुसार अनेक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी दर्शन घेतले आहे. 



फोटो -गणपती बाप्पा, कार्तिकेय आणि शिवलिंग यांच्या पुरातन मुर्त्या
Comments