शिवसेना पनवेल (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर शाखेत महापूजा उत्साहात संपन्न...
शिवसेना पनवेल (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर शाखेत महापूजा उत्साहात संपन्न...

पनवेल / प्रतिनिधी : - सालाबादप्रमाणे गुढी पाडव्या निमित्त शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शहर शाखेत सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न झाली. यावेळी पूजेसाठी श्री व सौ संकेत बुटाला दाम्पत्यास महापूजेचा मान मिळाला.

यावेळी शिवसेना शहर शाखेस महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, प्रितम म्हात्रे आदींनी महापुजेचे मनोभावे दर्शन घेऊन विजयश्री मिळविण्याचे आशीर्वाद घेतले.
तसेच अन्य मान्यवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी,नागरिकांनी देखील शाखेस भेट देऊन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच महापुजा दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी महिला संगीत भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

शाखेतील गुढीपाडव्या निमित्त असलेल्या महापुजेस सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.
Comments