रिक्षा चालकाचे पनवेल शहर पोलिसांकडून कौतुक...
प्रामाणिक रिक्षा चालकाचे पनवेल शहर पोलिसांकडून कौतुक...
पनवेल वैभव /दि १५(संजय कदम): रिक्षात सापडलेला मोबाईल फोन  प्रामाणिकपणे पनवेल शहर पोलीस स्टेशनला आणून दिल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी रिक्षा चालकाचे कौतुक केले आहे.  
           संदीप काळुराम पाटील रा. पारगाव असे या रिक्षा चालकाचे नाव असून त्याची रिक्षा क्रमांक एम.एच. ४६ ए.झेड. ७५८४ या रिक्षात पनवेल एस.टी.स्टॅन्ड समोरील रिक्षा थांब्यावर महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा  गणेश पाटील या सकाळी बसल्या व पनवेल शहर पोलीस ठाण्यात आल्या या प्रवासादरम्यान त्यांचा मोबाईल रिक्षाच्या मागील सीट वरील कोपऱ्यात पडला परंतु हि बाब वर्षा पाटील यांच्या लक्षात न आल्याने त्या घाई घाईने पोलीस ठाण्यात कर्तव्य बजाविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या काही वेळा नंतर रिक्षाचालक संदीप पाटील यांना त्यांच्या रिक्षामध्ये मोबाईल फोन पडल्याचे समजले त्यांनी तातडीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात येऊन सदर फोन जमा केला. व तो फोन वर्षा पाटील यांचा असल्याचे निष्पन्न झाले. रिक्षा चालक संदीप पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे पोलिसांनी  कौतुक केले आहे. 


कोट- 
रिक्षा चालकांच्या प्रामाणिकपणामुळॆ अनेक वेळा रिक्षात विसरलेल्या वस्तू प्रवाश्यांना परत मिळतात हा प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे. - वपोनि नितीन ठाकरेफोटो- रिक्षा चालकाचे कौतुक
Comments