सुरक्षा रक्षकांनी संपादक संतोष भगत यांचे मानले आभार...
सुरक्षा रक्षकांनी संपादक संतोष भगत यांचे मानले आभार...

पनवेल दि.०५(वार्ताहर): पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर सिडको आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महानगर पालिका त्यांना कायम करण्याच्या मनस्थीतीमध्ये नाही. या सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नाला रायगड पनवेलने वाचा फोडली त्याबद्दल सुरक्षा रक्षकांनी संपादक संतोष भगत यांचे आभार मानले.
            येथे कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे अनेक प्रश्न व मागण्या प्रलंबित आहेत. या संबंधात ते शासनाकडे पाठपुरावा सुद्धा करत आहेत. परंतु शासन दरबारी योग्य न्याय मिळत नाही आहे. याबाबत रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत यांनी त्यांच्या साप्ताहिकाच्या माध्यमातून या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न व मागण्या मांडल्या त्यामुळे संबंधित सुरक्षा रक्षकांनी संपादक संतोष भगत यांचे आभार मानले आहेत यावेळी सा. वार्तांकनचे संपादक संतोष सुतार उपस्थित होते.
फोटो: संपादक संतोष भगत सत्कार
Comments