लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात होत आहेत स्वसंरक्षणासाठी दिलेली शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा
स्वसंरक्षणासाठी दिलेली शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा
पनवेल वैभव / दि.22 (संजय कदम) ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परिमंडळ 2 हद्दीतील नागरिाकंनी, व्यापार्‍यांनी, राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी त्यांच्याकडे असलेली परवाना शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 99% शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
भयमुक्त वातावरणात निवडणुका संपन्न व्हाव्यात यासाठी नेहमीप्रमाणे पोेलीस खाक्याकडून परवाना शस्त्रे जमा करण्याचे आदेश निघाले होते. पनवेल परिसरातील सर्वच पोलीस ठाण्यातून अशा प्रकारे परवानाधारक शस्त्रे असलेल्या व्यक्तींना कळविण्यात आले होते. त्यानुसार संबंधित व्यक्तींनी आता आपली शस्त्रे आपल्या नजिकच्या पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. त्याचे प्रमाण 99% असून काही बँका, व्यापारी, पोलीस खाते आदींची शस्त्रे फक्त शासकीय नियमाप्रमाणे जमा करण्यात आली नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेे आहे.




फोटो ःसंग्रहीत पिस्तुल
Comments