टेम्पो पिकअप चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड ; ११ गुन्हे आणले उघडकीस...
             ११ गुन्हे आणले उघडकीस... 

पनवेल दि.२५(संजय कदम): पनवेल तालुका परिसरातून टेम्पो पिकअप चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड केले असून ११ गुन्हे आणले उघडकीस आणले आहेत.
              फिर्यादी नामे रफिक शेख यांचे दुकानासमोर, सोमाटणे रोड, कोन गाव याठिकाणी त्यांचा मोटार टेम्पो पिकअप क्र- एम एच ४६ इ ५४२३ हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याच्या यांच्या संमतीशिवाय चोरून नेला म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, स.पो.नी. निलेश फुले, हवालदार विजय् देवरे, महेश धुमाळ, सुनिल कुदळे, आकाश भगत, पोशी भीमराव खताळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन त्या अनुषंगाने कोनगाव, जेएनपीटी रस्ता, कळंबोली, दिघा, पडघा, खडवली, वाडा, जवार, कल्याण  ठिकाणवरील
तब्बल एकूण  37 ठिकाणाच्या  सीसीटीव्ही ची पाहणी करण्यात आली. सदर सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीस गेलेला पिकअप व चोरटा याचा मागोवा घेत घेत पोलिस् पथक खडवली, जि. ठाणे येथे संशयित चोरट्या आरोपीची हरकत सीसीटीव्ही फूटेज व गुप्त बातमी दारा मार्फत माहिती प्राप्त करुन पिकअप टेम्पो चोरी करणाऱा चोरट्याचा शोध सुरु केला असता सदर गुन्हा हा सराईत गुन्हेगार आरोपी सतीश सेहगल पुजारी (वय ४९ वर्षे, रा. ०२ बेंझर चाल, मरोळ मरोशी रोड, अंधेरी) याने केल्याचे माहिती मिळाली. त्याच्याबद्दल अधिक माहिती काढून पनवेल तालुका पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच अटक आरोपीने चोरी केलेला पिकअप याचे नंबर प्लेट बदलून त्याने सदर चा पिकअप हा राज्यस्थान येथील आरोपी नामे इन्साफअली लतीफ गाडेत मुसलमान (वय ५५ वर्षे, रा. नागौर, राज्य-राज्यस्थान) यास बाजारभावापेक्षा कमी दरात विकलेला असून वर नमूद दोन्ही आरोपीतांकडून गुन्ह्यतील चोरीस गेलेला मो.पिकअप 1,60,000/- रु. किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्यात ४६५,४६६,४६७, ४११ असे वाढीव कलम लावण्यात आले आहे. या आरोपी विरोधात डायघर, वाकोला, वडाळा, ओशिवरा, साकीनाका, धारावी डिसीबी सीआयडी या पोलीस ठाण्यांमध्ये ११ गुन्हे दाखल आहेत. फोटो: पिकअप  टेम्पो चोरणाऱ्या सराईत आरोपी - पोलिस अधिकारी
Comments